Friday, April 29, 2011

Sri Ahobila Nava Narasimha Kshetram


" Jwala ahobila malola kroda kaaranja bhargava
  yogananda chathravata paavano nava moorthaya "


SRI BHARGAVA NARASIMHASWAMY:

" Bharagavakhya tapasveesa 
   bhaavanaa bhaavithathmaney
   Akshaya theera theerthastu
   bhargavayaasthu mangalam "

SRI CHATHRAVATA NARASIMHASWAMY:

" Haahaa hoohoo vakya gandharva
   nrittageetha hritaatmaney
   bhavahantritat chathravataimhaya mangalam "

SRI YOGANANDA NARSIMHASWAMY:

" Chathuranana chetobja
   chitrabhaanu svaroopine
   vedadri gahavarasthaaya
   yogaanandaay mangalam "

SRI KARANJA NARSIMHASWAMY:

" Karanjamoole maatharaste yathra
   saarangaschakra dhrutham 
   Gobhoo hiranya nirvinna gobila
   gnyanadhayiney prabanjan sunaaseera
   kaaranchaayasthu mangalm "

SRI AHOBILA NARSIMHASWAMY:

" Garudadri guhagehe gajakhundasarittate
   hiranyasthaanvahankaarhaari simhaya mangalam "

SRI VARAHA (KRODA) NARASIMHASWAMY:

" Varahkundey medhinyai varaahaarthapradhaayiney 
   dhanthalagna hiranyaksh dhamshtra simhaaya mangalam "

SRI MALOLA NARASIMHASWAMY:

" Vaarijaavaaritha bhayay vaneepathi mukhaiswarai
   mahithaaya mahodhaara malolyasthu mangalam "

SRI JWALA NARSIMHASWAMY:

" Hiranyashtambha sambhuthiprakhyat paramaathamaney
prahladhaarthimushey jwaala narsimhaya mangalam "

UGRASTHAMBA

" satyam vidhathum nijabruthya bhaashitham 
   vyaaptham swabhutheshu swachirey swachaathmanaha|
   adhrushyathaam adhbutharoopam udhvaham
   sthamba sabhamam na mrugam na manusham

   na bhootho na ambharey mruthyuhu na
   naraih na mugrairapi surasura
   mahorakhai "

SRI PAVAN NARASIMHASWAMY:

" bharadwaja mahayogi mahapaathaka haariney |
   thaapaneeya rahasyartha paavanayasthu mangalam "

Thursday, April 28, 2011

Narasimha Maha Mantra and Narasimha Gayatri Mantra


Narasimha Maha Mantra

Om HrimKsraum ugram viram maha-vishnum
jvalantam sarvato mukham
narsimham bhishanam bhadram
mrityur mrityum namamy aham

"I bow down to Lord Narasimha who is ferocious and heroic like Lord Vishnu. He is burning from every side. He is terrific, auspicious and the death of death personified."


Narasimha Gayatri Mantra

Om Vajranakhaya Vidmahe
Tiksnadamstraya Dhimahi
Tanno Narasimhah Prachodayat

Om let us meditate the half-man and half-lion form of the Lord Narasimha. May this great God with his nails pierce our ignorance and with his fierce sharp tooth destroy the demon of darkness and illuminate our mind and understanding.


Adi Shankaracharya and Narsimha.



श्रीमत् पयोनिधि निकेतन चक्रपाणे | भोगीन्द्र भोग मणिरंजित पुण्यमूर्ते,
योगिश शाश्वत शरण्य भवाब्धि पोत | लक्ष्मीनृसिंह ममदेहि करावलम्बम् ||

In Kaliyuga, Sri Adi Shankaracharya composed the Narsimha Karaavalamba Stotra.
Adi Shankara, who was in parakaya pravesh, sought the help of Lord Narsimha, when he sensed that his body was being burnt. At that time, when he recited the Karaavalamba Stotra, the Lord is belived to have appeared before Adi Shankara and relived him from his misery. On another occasion, Adi Shankara was saved from Kaapalika, the black magicia, by Lord Narsimhaswamy, who descende upon Padmapaada, the ardent disciple of Adi Shankara and killed Kaapalika.

Wednesday, April 27, 2011

व्रते व उपासना

शनिवार हा नरसिहाचा वार. वैशाख शुध्द चतुर्दशी दिवशी नरसिंह जयंती असते
सायंकाळी उत्सव साजरा करतात.

श्री नृसिंह व्रत प्रत्येक महिन्याच्या कृष्ण अष्टमी दिवशी करावे 
|| ॐनृसिहाय नमः|| १०८ वेळा जपावे.
षोडशोपचारी  पूजा करावी.
त्रयोदशी व्रत -कोणत्याही महिन्याच्या गुरुवारी त्रयोदशी दिवशी हे व्रत करावे 
द्वादशी व्रत -फाल्गुन महिन्यातील कृष्ण  द्वादशीला हे व्रत करतात 
चतुर्दशी व्रत -वैशाख शुध्द चतुर्दशीला हे व्रत करावे शनिवार नक्षत्र स्वाती व सिद्धी योग शुभ मानतात 
'क्ष्रौम' महा बीज मंत्र आहे, 'क्ष' हे शक्तीचे द्योतक आहे, 'र' हे ब्रह्माचे निदर्शक आहे 'औ' म्हणजे उर्ध्वकेशी होय आणि 'म' कार दुखहरण  करणारा  बिंदू आहे. अत्री ऋषींनी गायत्री  छंद  मध्ये  स्वरबध्द  केले आहे. ॐ काराने संपुटीत केलेला जप सिद्ध होतो कोणत्याही महिन्याच्या शुध्द त्रयोदशीला सुरुवात करावी व समाप्ती सुद्धा त्रयोदशीला करावी 
"ॐनमो भगवते नरसिहाय।"
"ॐनमो नारायणाय।"
याही मंत्राचा जप करावा 

Thursday, April 21, 2011

महाराष्ट्रातील काही नरसिहाची मंदिरे




महाराष्ट्रातील काही नरसिहाची मंदिरे 

कोळे नरसिह्पूर- येथील प्राचीन मंदिर स्वयंभू मूर्ती 
सांगवडे- कोल्हापूर येथील श्री नृसिहासंहारक मंदिर 
धोम- सातारा येथील नरसिंह मंदिर 
कुडाळ- सिंधुदुर्ग येथील फणसाच्या लाकडाची मूर्ती,येथे सुपारीचा कौल लावतात.
बाभूळगाव- कुर्डूवाडी येथील नरसिहाचे मंदिर 
ताथवडे- पुणे येथील वालुकामय मूर्ती 
रांजणी- पुणे येथील नरसिहाचे मंदिर म्हणजे क्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके याचे आश्रय स्थान होते .लाखोजीबुवा ब्रह्मे यांच्यास्वप्नात साक्षात्कार झाला नीरा नरसिहाचे येथे आगमन झाले .
पुणे- येथील कारकोळ पुरा येथील जोशी याचे मंदिर 
कोपर्डे- कराड जवळ शिव कालीन मंदिर नारायण दिवाकर [कृष्ण  दयार्णव याचे वडील ]स्वप्न साक्षात्कारा नुसार मंदिर स्थापना .
रायबाग- येथील मंदिर 
राहेर- नगर येथील मंदिर याचे वर्णन दासू गणु नी केले आह .
भातोडी-  नगर जिल्ह्यातील ११ व्या शतकातील सुंदर शिल्प असलेले मंदिर 
त्र्यंबकेश्वर- येथे कुशावर्त  कुंडाजवळ  हे क्षत्र आहे .
सिन्नर- यादवकालीन शिव पंचायतन यात नरसिहाचे मंदिर 
निफाड- स्वयंभू मूर्ती काळ्या रंगाचा तांदळा स्वरूपात नरसिहाचे दर्शन .
जळगाव- बालाजी मंदिरात डाव्या बाजूला नरसिहाचे मंदिर 
गणेशलेणे- या प्राचीन लेण्यात नार्सिहाची मूर्ती आहे .
सायखेड- गोदावरी शिवणा  याच्या संगमावर बेटावर हे मंदिर असून या बेटाला मणि पर्वत असे म्हणतात मध्वमुनिश्वरांनी  या नरसिहाची गौरव पडे रचली आहेत .
पैठण-  संत एकनाथाच्या वाड्यापासून जवळ एका मंदिरात वामललित आसनातील नरसिहाची काळ्या पाषाणाची सुंदर मूर्ती आहे .
निलंगा- येथील नीलकंठेश्वर महादेव मंदिरात शिव नरसिहाची उत्कृष्ठ मूर्ती आहे 
घनसांगवी- येथे हेमाड पंथी नरसिहाचे मंदिर .येथे धानस्थ मूर्ती आहे .
बीड- उत्तराभिमुख मंदिर.येथे दासोपंत याची समाधी आहे .
राक्षसभुवन- येथेही नरसिहाचे मंदिर आहे .
शेळगावनांदेड जिल्ह्यातील मांजरा लेडी संगमावर शिव मंदिरात नार्सिहाची मूर्ती याला योग नार्सिहाची मूर्ती म्हणतात 
नांदेडशहराच्या होळी भागात हे मंदिर असून किल्ल्यातही आणखी एक मंदिर आहे 
टेम्बुर्णी-  येथेही मराठा शैलीचे मंदिर आहे 
नरसीपरभणी  जिल्ह्यात हे क्षेत्र येते 
मानवतयेथे तांदळ्याच्या स्वरुपात  नरसिहाचे दर्शन होते 
राजापूरपरभणी येथे हे क्षेत्र येते 
पोखरणीपूर्वीचे नाव पुष्करणी येथे साळापुरीचा नरसिहाचे आगमन झाले.
वरुडयेथे द्विभुज आसनस्थ नरसिहाची मूर्ती आहे 
धर्मापुरीपरभणी येथे हे क्षेत्र असून येते अनेक नरसिहाच्यामूर्ती आहेत तेजोमय,पर्णमय,पीत,श्वेत,जालस्थ ,पर्जन्य अशा देवता आहेत.

Tuesday, April 19, 2011

Vividha Narsimha Darshan

Nira Narsimhapur

Narsimha

Kaadri Narsimha


LakshmiNarsimha

Panak Narhari

Simhachalam

Yoga Narsimha, DEVARAYANADURGA

Hampi Narsimha
Pokharni

Dharmapuri Lakshmi Narsimha 

Dharamapuri

Aarti

आरती 
आरती श्री नरसिहाची।अच्युत भक्तवर प्रभुची॥धृ 
पाहुनी प्रल्हादाची भक्ती ।धरिली अद्भुत ती मूर्ती 
गुरगुर शब्द कानी पडती ।दचकला असुर तो चित्ती 
स्तंभी मुष्टी घात केला ।कडकडे स्तंभ ,गडगडे नभ ,धरुनी देवे 
सिहाची गर्जना केली ॥आरती 
बसला जाउनिया द्वारी ।घेउनी त्या मांडीवरी 
फोडिले पोट चीरीचिरी।नखे खुपशिली उदरी 
घेतला प्राण असुराचा ,तोषले सुर,कपि मुनिवर ,मनुज सुखकर ,
लाज राखी नीज भक्ताची ॥वाणी राखिली ब्रह्मयाची ॥आरती 
सिह मुख  दिसे भयंकर ।दाता चावितसे करकर 
जिव्हा लोळे चरचर।शोभे आयाळ सुंदर 
शोभला आतडीने गळा ,भक्त प्रभुपाया ,लोळे लवलाही ,
दया मनी येई ,वाणी राखिली प्रल्हादाची ॥राखी लाज त्रिम्बकाची
आरती श्री नरसिहाची।अच्युत भक्त वर प्रभुची ॥

Tuesday, April 12, 2011

aarati naagobaachi

संत रामदास कृत श्री नागदेवाची आरती 
मही धरोनी माथा ऐसे तू जाणे 
शंकर कंठी मिरवी तुझे भूषणे ।
सकळांच विश्वास तुजपाशी जाणे 
म्हणोनी अमृत कुंडे  ठेवी रक्षणे ॥१ ॥
जयदेव जयदेव जय नागेशा 
आरती ओवाळू तोडू भवपाशा ॥धृ ॥
सूर्याच्या रथाचे वारू जाउनी लंकेची 
निळे करुनी सत्य दावी मातेसी 
ऐसा प्रताप तुझा कळला देवासी
म्हणोनी अखंड नामे भजतो नागेशी ॥
मार्गेश्वर पंचमीस  तू पाव 
तुझे नामे लोक करिती उत्सव 
प्रसन्न होऊनी त्याचा पुरविसी निर्वाह 
तुझे चिंतन केलीया
दासा नीज बोधी नाव 

Saturday, April 9, 2011

नरसिंह प्रार्थना

श्री संत कल्याण सेवक शंकराचार्य महाराज  यांच्या मुखातून उस्फुर्तपणे आलेले काव्य 
कोळे-नरसिहपूर  ख्यात प्रसिद्ध क्षेत्र।कृष्णा तटी सुबक घाट पवित्र पात्र ॥
देवालयी परम गुप्त भुयार श्रेष्ठ ।मूर्ती पुरातन अतीव नृसिहा श्र्ष्ट ॥
ज्वाला नृसिहा ,कर षोडश.पाच फूट।कोरीव काम अति उत्कट नीट नेट॥
पूर्णत्व शिल्प प्रभू मूर्ती .दशावतार ।हातावरील शुभ चिन्ह .किरीट तार ॥
आहे पुरातन महा नरसिंह क्षत्र ।सिद्धेश्वरा प्रकट देवही भक्त पात्र ॥
श्री नामदेव इह कीर्तनकार श्र्ष्ट ।कट्टा  नदीवर असे बघ पार जेष्ठ ॥
ऋषी पराशर प्रसन्न नरसिंह मूर्ती । कृष्णेत अर्पित मुनीच नरसिंह तीर्थी ।
काढी शके शतक, कुंडल भीमराजा ।  डोहातुनी विमलभाव जना समाजा ॥
कृष्णा महात्म्य बघता समजे जनास । ऋषी पराशर करी तप तीव्र खास ॥
कृष्णा तटी शिव प्रसन्न नरसिंह रूपे । दे दर्शना भुजहि षोडश शस्त्र रूपे ॥
कल्याण दे सकल सुसेवकांस । सिद्धेश्वरास अनुभूती हि नामयास ॥
प्रत्यक्ष देव सकलात नरसिंह राम । साक्षात नरसिंह शिव सेवक आत्मधाम ॥
सर्वावरी कर कृपा भगवान नरसिंह । राष्ट्रात स्वार्थ भरला नुरवी नरसिंह ॥
कल्याण कोण करती, कर राष्ट्र कार्य । सेवा नरसिंह जगती नरसिंह आर्य ॥
आर्यात आर्य नुरला न च नीती न्याय । स्वार्थांध लोक बनला भव भीती काय 
ना शौर्य धैर्य फसवी जन एकमेका । यावे नरसिंह जगती जन हाक ऐका ॥
कोळे नरसिंहपुरवास करी सुभाक्ता । कल्याण पूर्ण मिळते नरसिंह भक्त ॥
स्वानंद मानव मनास मिळे कृपेने । लक्ष्मी नरसिंह पद सेवक पूर्णतेने ॥

Narsimha Utsav










येथील उत्सव वैशाख शुद्ध सप्तमी पासून साधारणपणे दहा दिवस असतो. त्या वेळी उत्सव मूर्तीचे दालनातील भव्य सिंहासनावर विराजमान होत असते. उत्सवाचे काळात दशमी पासून प्रतिपदेपासून श्रींची पालखीतून नगरप्रदक्षिणा असते. उत्सवाची समाप्ती वैशाख वद्य प्रतिपदेला होते. त्या दिवशी दुपारी १२ चे सुमारास अवभृत स्नानास श्रींची स्वारी मंदिराचे बाहेर पडते. ज्वाला तीर्थावर उत्सवमूर्तीस कृष्णा स्नान होते. तेथेच मंगल आरती व पंचपदी होते व पालखी पुन्हा मंदिरात येते. लळीताच्या कीर्तनाने उत्सवाची सांगता  होऊन मानकरी लोकांना श्रीफलाचा प्रसाद दिला जातो. दुसरे दिवशी सर्व ग्रामस्थ मंडळींना आपल्या हरिजन बांधवांसह महाप्रसादाचे भोजन दिल्या नंतर उत्सवाची सांगता होते. हा उत्सव सर्व नागरिकांना भक्तिमार्गाने सामाजिक समतेची दीक्षा देणारा दीक्षांत समारोहच आहे.